पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रलंबित कामांच्या प्रगतीसाठी MGP अधिकाऱ्यांची बैठक; समाधानकारक निकालासाठी आंदोलन ठाम

इमेज
दिनांक 10 डिसेंबर रोजी MGP अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला. त्यांनी सर्व अपूर्ण कामांची यादी प्रतिनिधींना दिली व पुढील सर्व कामे स्वतः MGP ने पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. कंत्राटदारांकडून होणाऱ्या अडथळ्यांमुळे कामात व्यत्यय येऊ नये म्हणून संपूर्ण जबाबदारी MGP ने स्वतःकडे घेतली आहे. उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असल्यामुळे उर्वरित कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. सध्या चार पथके विविध ठिकाणी कार्यरत असून, काम अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आणखी दोन पथके लवकरच दाखल होत आहेत. सर्व सरपंच ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सूरज केदारी, शिवसेना तालुका अध्यक्ष आशिष ठोंबरे, मजीद शेख, भगवान(दादा) डफळ, राजेश काटकर आणि अन्य प्रतिनिधी सातत्याने MGP अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. MGP अधिकारी उपोषण संपविण्याची विनंती वारंवार करत आहेत. तथापि, समाधानकारक निकाल लागेपर्यंत उपोषण व आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय अद्याप कायम आहे. ही स्थिती प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांवर ताण आणत आहे.

ग्रामविकासात विलंब: स्थानिक नेतृत्वाची तत्परता विरुद्ध अधिकाऱ्यांची दिरंगाई

इमेज
दिनांक ०९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधत उपोषण समाप्त करण्याची विनंती केली. मात्र, प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण थांबविणे शक्य नाही.   या चर्चेदरम्यान असे निदर्शनास आले की, अनेक समस्या ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्याने सहज सुटू शकल्या असत्या. उदाहरणार्थ, एक्स्प्रेस हायवे नजीकच्या अंडरपासच्या समस्येचे समाधान करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) आणि कंत्राटदार यांना तीन महिने लागले. मात्र, हीच समस्या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. ज्ञानेश्वर गुंड आणि शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. आशिष ठोंबरे यांनी केवळ दहा मिनिटांत सोडवली.  एमजीपी आणि कंत्राटदार यांनी विलंब केला कारण त्यांना आयआरबी (इंडिया रोड ब्रिज) ची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सरपंच आणि तालुका अध्यक्ष यांनी तत्काळ आयआरबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अवघ्या दहा मिनिटांत ही परवानगी प्राप्त केली. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये एमजीपी आणि कंत्राटदारांकडू...

दिवस पहिला - जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या हलगर्जीपणामुळे कुसगाव-डोंगरगाव मधील नागरिक त्रस्त - आंदोलनाचा पवित्रा

इमेज
कुसगाव-डोंगरगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांमधील हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जलजीवन मिशन ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची संयुक्त योजना असून, ती सुरळीतपणे अंमलात आणण्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. संबंधित योजनेची पूर्ण होण्याची तारीख जुलै २०२३ होती. प्रत्यक्षात आज तागायात योजना पूर्ण झालेली नाही. तथापि, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या अपयशाचे खापर ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे.  ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता व करत आहे. मात्र, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधींनी आंदोलन आणि उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व कुसगाव-डोंगरगाव येथील नागरिकांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कुसगाव आणि डोंगर...