दिवस पहिला - जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या हलगर्जीपणामुळे कुसगाव-डोंगरगाव मधील नागरिक त्रस्त - आंदोलनाचा पवित्रा





कुसगाव-डोंगरगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांमधील हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जलजीवन मिशन ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची संयुक्त योजना असून, ती सुरळीतपणे अंमलात आणण्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. संबंधित योजनेची पूर्ण होण्याची तारीख जुलै २०२३ होती. प्रत्यक्षात आज तागायात योजना पूर्ण झालेली नाही. तथापि, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या अपयशाचे खापर ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. 

ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता व करत आहे. मात्र, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधींनी आंदोलन आणि उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व कुसगाव-डोंगरगाव येथील नागरिकांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुसगाव आणि डोंगरगावच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी आपल्या हक्कासाठी उभे राहणे गरजेचे आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांमध्ये होत असलेल्या हलगर्जीपणामुळे कुसगाव-डोंगरगावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या अपयशामुळे नागरिक संतप्त झाले असून, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधींनी आंदोलन व उपोषणाचा निर्णय घेतला आहे.  

https://forms.gle/XXtKUQH9TYjLXTjo8

आपण सर्वांनी सदर फॉर्म भरून जस्तीत जास्त पाठिंबा द्यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रलंबित कामांच्या प्रगतीसाठी MGP अधिकाऱ्यांची बैठक; समाधानकारक निकालासाठी आंदोलन ठाम

ग्रामविकासात विलंब: स्थानिक नेतृत्वाची तत्परता विरुद्ध अधिकाऱ्यांची दिरंगाई